Sun, Oct 20, 2019 06:33होमपेज › Vishwasanchar › लंडन :भारतीयांना आजही आवडते ही नोकरी

लंडन :भारतीयांना आजही आवडते ही नोकरी

Published On: Nov 09 2018 9:26PM | Last Updated: Nov 10 2018 1:46AMलंडन :

जागतिक स्तरावर झालेल्या एका पाहणीनुसार आजही करिअरसाठी भारतीय लोकांची पहिली पसंती शिक्षकाचीच आहे. ब्रिटनच्या व्हॅर्के फौंडेशन नावाच्या संस्थेने याबाबतची पाहणी केली आहे. ‘ग्लोबल टिचर स्टेटस इंडेक्स 2018’ असे या पाहणीचे नाव आहे. ही पाहणी 35 देशांमध्ये घेण्यात आली. 

भारतातील निम्म्यापेक्षाही अधिक लोक आजही स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी शिक्षण क्षेत्र पसंत करतात, असे यामध्ये दिसून आले. सुमारे 54 टक्के भारतीयांनी वेगवेगळ्या व्यवसायांची संधी उपलब्ध असताना आजही शिक्षणाचे क्षेत्रच करिअरसाठी सर्वोत्तम मानले आहे. हा आकडा 35 देशांमध्ये सर्वाधिक आहे. याबाबत भारतानंतर चिनी लोकांचा क्रमांक लागतो. तेथील 50 टक्के लोकांना शिक्षक बनणे पसंत आहे. ब्रिटनमधील केवळ 23 टक्के लोकांना शिक्षकाची नोकरी पसंत आहे तर रशियात अवघ्या 6 टक्के लोकांना शिक्षक होण्याची इच्छा आहे!