Wed, Feb 20, 2019 15:12होमपेज › Vishwasanchar › उचक्या थांबवण्यासाठी काही गमंतीशीर उपाय

उचक्या थांबवण्यासाठी काही गमंतीशीर उपाय

Published On: May 16 2018 5:25PM | Last Updated: May 16 2018 5:30PMपुढारी ऑनलाईन

कधी कधी अचानक उचकी लागल्यानंतर काहीजण  मस्करी करण्याच्या मुडमध्ये येतात. तर कोणाच्या तोंडी 'मला लागली कुणाची उचकी' या गाण्याचे बोल ऐकायला मिळतात.  कुणीतरी आठवण काढल्याने उचकी लागते असा समाजातील लोकांचा गैरसमज आहे. पण उचकी लागण्याची खरी कारणे वेगळीच आहेत. उचकी लागणे ही प्रक्रिया नैसर्गिक आणि अनैच्छिक अशी आहे. सतत स्नायु आकुंचन पावल्याने स्वरयंत्रांतील पट्ट्या जवळ आल्याने उचकी लागते. उचकी ही अचानकवेळी येते. कधी घरी तर कधी ऑफीस, कॉलेज, शाळा अशा अनेक ठिकाणी उचकी आल्यास ती थांबवणे अवघड होते. त्यासाठी काही उपाय..

खाली वाकून पाणी प्या

उचकी लागताच नेहमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कधी कधी उचकी थांबच नाही. अशावेळी ओंजळीतून पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. खाली वाकून पाणी पिल्याने उचकी लगेच थांबण्यास मदत होईल.   

Image result for ओंजळीने पाणी पिणे

धक्का बसणे किंवा घाबरणे

कधी कधी  मानसिक तणावातूनही उचकी लागू शकते.  एखाद्या गोष्टीचा  धक्का बसला किंवा घाबरल्यामुळे लक्षविचलीत झाल्यासही उचकी थांबण्यास मदत होते.  

Related image

जीभ बाहेर काढा

मानसाच्या प्रत्येक वायु हा स्नायुनी जोडलेला आहे. त्यामुळे जीभेचा संपर्क छातीमधील स्नायुला जोडला गेलेला असतो. उचकी लागताच जीभ बाहेर काढल्यास स्नायुंना आराम मिळून पटकन उचकी थांबण्यास मदत होते. 

Related image

मीठाचा वास घ्या

मीठाचा वास म्हटल्यावर थोडी संभ्रम अवस्था होईल, पण हे खरे आहे. उचकी लागताच मीठाचा वास घेतल्यास उचकी लगेच थांबते. तसेच लिंबू, चंदन, तुळस यांच्या वासानेही उचकी थांबते.

Image result for salt

बंद बॅगेत श्वास घ्या

संथ लयीत एका हवाबंद पिशवीत श्वासोच्छवास घेतल्यास उचकी थांबते. त्याने श्वासोच्छवासाची लयही सुधारते. जेवढ्या लवकर तुम्ही श्वास घ्याल तेवढ्या लवकर उचकी थांबण्यास मदत होते.

Related image