Wed, Apr 24, 2019 09:54होमपेज › Vishwasanchar › सुषमा स्वराज ठरल्या सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या नेत्या

सुषमा स्वराज ठरल्या सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या नेत्या

Published On: Jul 11 2018 10:22PM | Last Updated: Jul 11 2018 8:37PMवॉशिंग्टन :

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियात नेहमीच सक्रिय असतात व या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेकांना मदत केलेली आहे. आता त्या ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या महिला नेत्या ठरल्या आहेत. जगभरातील नेत्यांच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतीत तिसर्‍या स्थानावर आहेत. पोप फ्रान्सिस दुसर्‍या क्रमांकावर आहेत. 

संपूर्ण क्रमवारीचा विचार करता स्वराज यांचा सातवा क्रमांक लागतो. याशिवाय सुषमा स्वराज या जगभरातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या परराष्ट्रमंत्रीही ठरल्या आहेत. कम्युनिकेशन एजन्सी बीसीडब्ल्यूच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून ट्विटरवर ट्रम्प यांच्या फॉलोअर्समध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सध्या ट्रम्प यांचे ट्विटरवर 53 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोप फ्रान्सिस यांचा याबाबतीत दुसरा क्रमांक लागतो, त्यांचे ट्विटरवर सध्या 47 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरील लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी तिसर्‍या क्रमांकावर असून, त्यांचे 42 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.