Mon, Dec 10, 2018 04:06होमपेज › Vishwasanchar › ही 'गोड' वधू तुम्ही पाहिली का ?

ही 'गोड' वधू तुम्ही पाहिली का ?

Published On: Feb 13 2018 4:00PM | Last Updated: Feb 13 2018 4:22PM
टीम पुढारी ऑनलाईन
सोशल मीडिया म्हटल की व्हायरल गोष्टी आल्याच. अनेक फोटोज, व्हिडिओज व्हायरल  होत असतात. काही खरे असतात तर काही खोटे. सध्या सोशल मीडियावर वधुवेशात एका युवतीचा फोटो व्हायरल होत आहे. तुम्ही ही पाहिला असेल तिचा फोटो, अनेक जण तर तिच्या प्रेमात, तर कोणी तिच्या पेहराव्याच्या प्रेमात पडले आहे. पण ती एक युवती नसुन तो केक आहे.


एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या केकची किंमत पाच कोटी पेक्षा जास्त आहे.  हा केक दुबईमधील एका लग्न समारंभासाठी बनवण्यात आला आहे.  ब्रिटनमधील फेमस डिजाइनर डेबी विनगम यांनी हा केक बनवला आहे. 

Image may contain: 1 person, standing
हा केक बनवण्यासाठी  हजार अंडी, पाच हजार हँडकट फुले, वीस किलो चॉकलेट, मोती, हिरे यांचा वापर करण्यात आला आहे. हा केक बनवण्यासाठी दहा दिवस लागले. तसेच केक बनवण्यासाठी डेबीने बारा तास काम केले आहे. डेबी यांना जगातील सर्वात महागडी डिजायनर म्हणून ओळखले जाते. त्यांचे केक पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात.

Image may contain: one or more people