Wed, Apr 24, 2019 09:30होमपेज › Vishwasanchar › हार्ट ब्लॉकेजेस रोखण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्‍त

हार्ट ब्लॉकेजेस रोखण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्‍त

Published On: Jul 11 2018 1:49AM | Last Updated: Jul 10 2018 7:53PMनवी दिल्ली : सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणं आणि वेळेवर त्याचं निदान न होणं हे हार्ट अ‍ॅटॅकचं एक प्रमुख कारण आहे. हे ब्लॉकेज टाळण्यासाठी आहारातील काही पदार्थ मदत करीत असतात. त्यामध्ये कलिंगड, हळद, लिंबुपाणी, वेलची आदींचा समावेश आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कलिंगडमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो अ‍ॅसिड असते. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती होते.

या ऑक्साईडमुळे रक्‍तवाहिन्यांना आराम मिळतो. दाह कमी करणे, रक्‍तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हळदीमध्ये व्हिटॅमिन बी 6 घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हृदयाला बळकटी मिळते. हार्ट ब्लॉकेजचा त्रास कमी करण्यासाठी नियमित हळदीचं दूध पिणे चांगले. नियमित लिंबूपाणी प्यायल्यानेही हार्ट ब्लॉकेज कमी करण्यास मदत होते. लिंबूपाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचा धोका कमी होण्यास मदत होते. नियमित वेलची खाल्ल्यानेही हार्ट ब्लॉकेजच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.