Sun, May 31, 2020 13:49होमपेज › Vishwasanchar › व्हॉटस् अ‍ॅपवर पाळत ठेवणारे स्पायवेअर !

व्हॉटस् अ‍ॅपवर पाळत ठेवणारे स्पायवेअर !

Published On: May 15 2019 1:45AM | Last Updated: May 14 2019 8:13PM
न्यूयॉर्क : एका चुकीच्या सॉफ्टवेअरमुळे विशिष्ट यूजर्सवर व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जर तुम्ही व्हॉटस् अ‍ॅप अपडेट केलेले नसेल तर लगेचच करा, असे कंपनीने सुचवलं आहे. सुरक्षेसंदर्भात एक चूक या अ‍ॅपमध्ये राहिल्यामुळे लोकांच्या स्मार्टफोनमध्ये एक स्पायवेअर इन्स्टॉल झालं आहे, असं व्हॉटस् अ‍ॅपनंच जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. हे स्पायवेअर इस्रायलमधील ‘एनएसओ’ ग्रुपनं बनवलं आहे.

कंपनीनं आपल्या 1.5 अब्ज ग्राहकांना व्हॉटस् अ‍ॅप अपडेट करण्याची विनंती केली आहे. यासंबंधीचं पहिलं प्रकरण या महिन्यात समोर आलं होतं.सतत सुरक्षिततेवरून संशयाच्या भोवर्‍यात राहणारी फेसबुक कंपनी व्हॉटस् अ‍ॅपची मालक आहे. त्यामुळे नवीन प्रश्‍नं उद्भवण्याची शक्यता आहे. व्हॉटस् अ‍ॅप कॉलच्या माध्यमातून हे चुकीचं सॉफ्टवेअर लोकांच्या फोनमध्ये इन्स्टॉल झालं आहे. एखाद्या युजरने कॉलचं उत्तर नाही दिलं तरीसुद्धा हे स्पायवेअर फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकतं, असं कंपनीने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की हा दोष सर्वांत आधी आमच्याच सुरक्षा टीमच्या लक्षात आला. यासंबंधीची माहिती आम्हीच काही मानवाधिकार कार्यकर्ते आणि अमेरिकेच्या न्यायपालिकेकडे या महिन्याच्या सुरुवातीला सोपवली होती. ही त्रुटी लक्षात आल्यावर व्हॉटस् अपने ती दूर केली आहे.