Fri, Oct 20, 2017 08:36होमपेज › Vishwasanchar › अंतराळवीरांनी केला स्पेसवॉक!

अंतराळवीरांनी केला स्पेसवॉक!

Published On: Oct 12 2017 2:06AM | Last Updated: Oct 12 2017 3:00PM

बुकमार्क करा

वॉशिंग्टन ः पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर पडून दोन अंतराळवीरांनी स्पेसवॉक केले आणि स्थानकाची काही कामे पूर्ण केली. हे स्पेसवॉक 6 तास आणि 26 मिनिटांचे होते. 
सध्या स्थानकात ‘एक्सपिडिशन 53’चे अंतराळवीर आहेत. कमांडर रँडी ब्रेस्निक आणि फ्लाईट इंजिनिअर मार्क व्हँडे हेई यांनी स्थानकाबाहेर पडून स्पेसवॉक केले. अशाप्रकारचे तीन स्पेसवॉक नियोजित असून, हा त्यापैकी दुसरा स्पेसवॉक होता. यामध्ये स्थानकावर लावलेला एक नादुरुस्त कॅमेरा दुरुस्त करण्यात आला. याच महिन्यात तिसरा आणि अखेरचा स्पेसवॉकही केला जाणार आहे. हा स्पेसवॉक 18 ऑक्टोबरला होईल. हा दुसरा स्पेसवॉक ब्रेस्निकच्या कारकिर्दीतील चौथा आणि वँडेसाठी दुसरा स्पेसवॉक होता.