Sat, Jul 04, 2020 10:56होमपेज › Vishwasanchar › प्रियांकालाही ‘नेपोटिझम’चा झाला होता त्रास

प्रियांकालाही ‘नेपोटिझम’चा झाला होता त्रास

Last Updated: Jul 01 2020 8:08AM
मुंबई ः बॉलीवूडमधील ‘नेपोटिझम’ म्हणजेच ‘भाई-भतीजावाद’ किंवा कंपुगिरीबाबत प्रथम आवाज उठवला तो कंगना रणौतने. आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा विषय आणखीच चर्चेत आला आहे. यानिमित्ताने अन्यही अनेक कलाकार आपल्याला याबाबत कसा अनुभव आला याची मोकळेपणाने माहिती देत आहेत. सध्या एक आंतरराष्ट्रीय स्टार बनलेल्या प्रियांका चोप्रानेही नुकतीच याबाबतची माहिती दिली. आपल्यालाही नेपोटिझमची झळ लागली होती आणि वाईट वागणूक मिळाली होती असे तिने म्हटले आहे.

प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले की याठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. इथे स्टारकिडस्ना आपल्या कुटुंबाचे नाव राखण्याचा दबाव असतो. प्रत्येक स्टारची स्वतःची एक कहाणी असतेच. माझ्या संघर्षाच्या काळात मलाही बरेच काही सहन करावे लागले होते. एका चित्रपटातून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

माझ्याऐवजी अन्य एका अभिनेत्रीची दिग्दर्शकाला शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी मी खूप रडले होते; पण हा विषय मागे टाकून पुढे गेले. जे लोक यशस्वी झालेले असतात त्यांनी अडथळ्यांना मागे टाकलेले असतेच. एखाद्या मॅरेथॉन रेसप्रमाणे सेलिबि—टींचे जीवन असते. त्यांच्यावर अनेक जबाबदार्‍या असतात. ज्यावेळी एखाद्या सेलिबि—टीची तब्बेत खराब होते त्यावेळी त्या दिवशी सेटवर काम करणार्‍या तीनशे लोकांच्या दिवसाच्या कमाईवरही परिणाम होतो.