Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Vishwasanchar › लग्नात वधुच्या गळ्यात घातला सापाचा हार(व्हिडिओ)

लग्नात वधुच्या गळ्यात घातला सापाचा हार(व्हिडिओ)

Published On: Nov 15 2017 12:47AM | Last Updated: Nov 14 2017 9:01PM

बुकमार्क करा

बीड : पुढारी ऑनलाईन

लग्नात वर आणि वधु एकमेकांना हार घालतात (आणि ब्यांड वाजू लागतो, फटाक्यांची माळ उडू लागते, मुठीत उरलेल्या अक्षता लोक एकमेकांच्या अंगावर फेकू लागतात वगैरे वगैरे...) हे आपल्याला माहिती आहेच. मात्र एका लग्नात वराने वधुच्या गळ्यात (आणि वधुने वराच्या गळ्यात) चक्क साप घातला. बीड येथील सिध्दार्थ सोनावने या तरुणाचा हा विवाह सोहळा असून, त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. 

हा व्हीडिओ सर्व देशभर प्रसिध्द झाला आहे. अडीच मिनिटांच्या या व्हीडिओत सुरूवातील एखाद्या साधारण लग्नासारखेच चित्र दिसते. वर-वधु, आनंदी वर्‍हाडी वगैरे दिसून येतात. मात्र एकमेकांना हार परिधान करण्याची वेळ येते त्यावेळी लग्नाचे वेगळेपण समोर येते. काहीजण दोन पेट्यांमधून दोन साप घेऊन घेऊन येतात. त्यापैकी एक चक्क अजगर आहे. विवाहाचे विधी झाल्यावर हे दोघे एकमेकांच्या गळ्यात सापांचा हा हार घालतात. कदाचित हे दोघेही सर्पमित्र असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.