Wed, Jun 19, 2019 08:46होमपेज › Vishwasanchar › ईस्टर आयलंडवरील पुतळ्यांचे उकलले गूढ?

ईस्टर आयलंडवरील पुतळ्यांचे उकलले गूढ?

Published On: Oct 12 2018 12:55AM | Last Updated: Oct 12 2018 12:55AMलंडन : जगातील आश्‍चर्यांमध्ये ईस्टर आयलंडवरील मानवी चेहर्‍यांच्या भव्य पुतळ्यांचा समावेश होतो. या बेटावर एके काळी मनुष्य वस्ती होती व कालांतराने हे बेट निर्जन झाले. या बेटाबाबतचे गूढ उकलण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता संशोधकांनी याबाबतचे रहस्य उलगडले असल्याचा दावा केला आहे. बिंघम्टन युनिव्हर्सिटी तसेच न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्व संशोधकांनी म्हटले आहे की, बेटावरील पेयजलाच्या भूमिगत स्रोतांच्या ठिकाणी खुणेसाठी हे पुतळे उभे करण्यात आले होते.

या संशोधकांना असे दिसून आले की, बेटाच्या किनार्‍यालगतच्या काही भागातील पाणी कमी खारट व पिण्यायोग्य होते. अशा ठिकाणीच या पुतळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ज्या ठिकाणी असे जमिनीतील पाण्याचे स्रोत आम्ही शोधले तिथे हे पुतळे होते, असे कार्ल लिपो या संशोधकाने सांगितले. ज्या ठिकाणी असे पाणी तत्काळ उपलब्ध होऊ शकते, अशा नेमक्या ठिकाणी एखादा पुतळा होता व हा काही निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. या बेटावर अनेक अतिभव्य पुतळे आहेत. मात्र, सरासरी 13 फूट उंचीचे पुतळे अधिक प्रमाणात आढळतात.