Fri, Jul 19, 2019 16:33होमपेज › Vishwasanchar › अनुष्का स्वच्छतेबाबत करणार जागृती

अनुष्का स्वच्छतेबाबत करणार जागृती

Published On: Sep 15 2018 1:51AM | Last Updated: Sep 14 2018 9:14PMमुंबई : पाश्‍चात्यांमध्ये आणि भारतीय लोकांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत बहुतांशी व्यस्त प्रमाण आढळते. आपली वैयक्तिक स्वच्छता तशी बरी असते. एके काळी आपल्या देशात त्रिकाळ स्नान करण्याचीही प्रथा होती. पाश्‍चात्य देशांमध्ये थंडी किंवा तत्सम कारणांमुळे आंघोळीला साप्ताहिक कोष्टकात बसवले जाते! मात्र सार्वजनिक स्वच्छतेचा विषय आला की, आपण पाश्‍चात्यांच्या तुलनेत कुठेच बसत नाही. कोणत्याही गाव, शहरातील कचर्‍याने भरलेले चौक, पान खाऊन रंगवलेल्या भिंती आदी याची साक्ष सहज देतील. आपल्याकडे आता स्वच्छतेबाबत अभियानच सुरू करण्यात आलेले आहे. अनुष्का शर्मा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ आंदोलनात सहभागी झाली आहे.  याबाबत तिने सांगितले, स्वच्छतेबाबत लोकांचा दृष्टिकोण वेगवेगळा आहे हे पाहून मला नेहमी दुःख होते. लोक नेहमी आपल्यापुरता विचार करतात. स्वतःच्या घराची सफाई करून कचरा सरळ दुसर्‍याच्या दारात नेऊन टाकतील! मी नेहमीच स्वच्छतेबाबत जागरूक राहत आलेली आहे आणि आता तर मी अधिकृतरीत्याही स्वच्छ भारत अभियानाशी निगडीत झाले आहे. प्रत्येकाने स्वच्छता मनावर घेतली तर त्याचा सार्वत्रिक परिणाम सहज दिसून येऊ शकतो. पर्यावरण कुठल्या एका देशाचे नाही तर संपूर्ण जगाच्या हिताशी निगडीत आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे. लोकांनी स्वच्छता, पर्यावरणाची काळजी याबाबत कोणत्याही संकुचित वृत्तीमधून बाहेर पडण्याची आता गरज आहे. अस्वच्छतेमुळे वाढणार्‍या आजारांचाही धोका लक्षात घेतला पाहिजे.