होमपेज › Vishwasanchar › टीप म्हणून दिले चक्क १ लाख ३१ हजार! 

टीप म्हणून दिले चक्क १ लाख ३१ हजार! 

Published On: Apr 17 2018 5:20PM | Last Updated: Apr 17 2018 5:20PMशिकागो : पुढारी ऑनलाईन

एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील जेवण, वेटरची सेवा अन्य सुविधा यावर तुम्ही खुश होऊन टीप देता. पण ही टीप किती असावी? भारतासारख्या देशात फार तर फार 50 ते 100 रुपये दिले जातात. पण जेवणाच्या बिलापेक्षा टीप दिलेली रक्कम अधिक असेल तर?, विश्वास बसत नाही ना, पण असे खरोखर घडले आहे.  

अमेरिकेतील शिकागो शहरात एका ग्राहकाने रेस्टोरेंटच्या स्वादिष्ट जेवणावर खुष होऊन वेटरला टीप म्हणून  १ लाख ३१ हजार रूपये दिले. भारता प्रमाणेच अमेरिकेतील देखील ग्राहक फार मोठी टीप देत नाहीत. पण येथील एक ग्राहक त्याने दिलेल्या टीपमुळे चर्चेत आला आहे. स्वादिष्ट जेवणावर खुष होणाऱ्या टीप देणाऱ्याचे  नाव माइक असे आहे. सिएटल  शहरात राहणारा हा ग्राहक जेवणासाठी  शिकागोमधील बोका रेस्टोरेंट गेला होता. जेवण झाल्यानंतर त्याला बिल देण्यात आले.  759 डॉलर (म्हणजेच ५० हजार रूपये) त्याच्या जेवणाचे बिल झाले होते. माइकला येथील स्वादिष्ट जेवण आणि तेथील सर्व्हिस इतकी आवडली की त्याने टीम म्हणून  2000 डॉलर  (म्हणजेच १ लाख ३१ हजार रूपये) दिले.

माईकने प्रथम सर्व वेटरना प्रत्येकी 300 डॉलर टीप दिली. त्यानंतर तो किचनमध्ये गेला आणि येथील प्रत्येकाला १००-१०० डॉलरची टीप दिली.  रेस्‍टॉरंटमध्ये 17 जणांचा स्टाफ आहे.
बोका हे रेस्‍टॉरंट शहरातील महागड्या रेस्‍टॉरंटपैकी एक आहे. या महागड्या टीपची माहिती बोकाने इस्टाग्रामवरून दिली. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर शेअर झाली.

 

Tags : chicago,  boka,  restaurant , america