Thu, May 23, 2019 23:01होमपेज › Vidarbha › जळगाव : एकलग्नजवळ अपघात, माय-लेक ठार

जळगाव : एकलग्नजवळ अपघात, माय-लेक ठार

Published On: Jun 12 2018 3:35PM | Last Updated: Jun 12 2018 3:35PMजळगाव : प्रतिनिधी 

पारोळ्याहून जळगावकडे येणार्‍या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने  माय-लेक  ठार झाल्या.  तर वडिल जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सुकदेव ओंकार पाटील (वय ५०) हे त्यांची पत्नी संगीता सुकदेव पाटील (वय ४७) व मुलगी काजल सुकदेव पाटील पारोळा येथून जळगाव येथील रामेश्‍वर कॉलनी येथे राहत्या घरी येत होते. सकाळी ८.३० वाजण्‍याच्या सुमारास एकलग्न येथे मागून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यात संगीता सुकदेव पाटील व काजल पाटील या ठार झाल्या. तर सुकदेव पाटील यांना मार लागल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जखमी सुकदेव पाटील हे खासगी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी काजल हिचा विवाह करावयाचा असल्याने ते पारोळा येथे नातेवाईकांकडे गेले होते. परंतु, जळगावला येताना ही दुर्देवी घटना घडली.