Wed, Jun 26, 2019 15:15



होमपेज › Vidarbha › वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर

वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर

Published On: Nov 19 2018 5:17PM | Last Updated: Nov 19 2018 5:17PM



अमरावती : पुढारी ऑनलाईन

अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज (सोमवार)वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक या घटनेतून थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुमो गाडीचा चुराडा झाला आहे.

धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता सरळ तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक घालू  त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी नाईक गाडीतून खाली उतरले होते. त्‍यामुळे ते बचाविले, मात्र, या दुर्घटनेत  नाईक जखमी झाले आहेत. 

दरम्‍यान, पोलिसांनी डंपर चालकास ताब्‍यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीय सुरू आहे.