होमपेज › Vidarbha › बीड : बिअर बारवर दरोडा, दोघे ताब्यात

बीड : बिअर बारवर दरोडा, दोघे ताब्यात

Last Updated: Jan 24 2020 9:03AM
बीड :  प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी मध्यरात्री दिंद्रुड येथील बीड-परळी हायवेवरील कैलास आप्पा ठोंबरे यांच्या स्वागत बिअर बारवर दरोडा टाकण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज आधारे दिंद्रुड ठाण्याचे एपीआय अनिल गव्हाणकर आणि बीड दरोडा प्रतिबंधक विभाग या प्रकरणातील आरोपीच्या शोधात होते. गुप्त माहितीच्या आधारे केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे घरावर छापा टाकून दोघांना या दरोडा प्रकरणातील मुद्देमालासह पकडण्यात दिंद्रुड पोलिस, बीड प्रतिबंधक विभाग पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणातील पकडण्यात आलेले दोन आरोपी केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथून ताब्यात घेतले असून अमोल देविदास काळे (रा. पैठण) आणि राजा अर्जुन पवार (रा. बनसारोळा तालुका केज) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अन्य काही जण फरार आहेत.

त्यांच्याकडून एक टीव्ही, दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्हा मान्य केला असून त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे एपीआय अनील गव्हाणकर यांनी दिली आहे.