Wed, Jun 26, 2019 01:49होमपेज › Vidarbha › व्यास आणि वाल्मीकी दलित होते : राजनाथ सिंह

व्यास आणि वाल्मीकी दलित होते : राजनाथ सिंह

Published On: Jan 21 2019 1:39AM | Last Updated: Jan 21 2019 12:41AM
नागपूर : प्रतिनिधी

रामायण आणि महाभारताचे रचनाकार महर्षी वाल्मीकी व व्यास हेही दलित समाजातूनच आले होते, असे वक्‍तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केले. सिंह यांच्या या वक्‍तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची विजयी संकल्प सभा येथील कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख वक्‍ते म्हणून राजनाथ सिंह बोलत होते. पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारताचा संदेश देऊन एक नवीन संकल्पना उभी केली आहे. मात्र काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भाजपाबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करीत आहे. अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडावे असे आवाहनही राजनाथ सिंह यांनी केले.