Mon, Jul 13, 2020 11:26होमपेज › Vidarbha › भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली : शरद पवार

भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली : शरद पवार

Last Updated: Oct 09 2019 2:00PM
बाळापूर (अकोला) : पुढारी ऑनलाईन 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला  चढवला. बेरोजगारीवरून त्यांनी सरकारवर तोफ डागताना चांगलाच समाचार घेतला. त्यांची अकोला येथील बाळापूर येथे सभा झाली. 

या सभेत बोलत असताना शरद पवार म्हणाले, 'आम्ही शेतकऱ्यांचं हित जपलं. सत्ताधाऱ्यांच्या काळात ६९ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळायला हवी. शेतकऱ्यांचं हित जोपासण्याची सत्ताधाऱ्यांची नियत नाही. शेतकऱ्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवावी.'

राज्यात मागील ५ वर्षांत बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील अनेक मोठ्या कंपन्या बंद झाल्या. जेट एअरवेज बंद झाले. २० हजार लोक बेरोजगार झाले. मोदींच्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले, भाजपच्या राजवटीत कारखानदारी बंद पडली. भाजप सरकारने नोटबंदी करून लोकांना बँकेच्या दारात उभं केलं. नोटबंदीमुळे १०० जणांचा बळी गेला. नोटबंदीच्या झटक्यातून लोक सावरलेले नाहीत, अशी जोरदार टिका शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली. 

शरद पवार यांची दुसरी सभा दुपारी चार वाजता वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंदा येथे होणार आहे.