Mon, Sep 16, 2019 05:35होमपेज › Vidarbha › जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

Published On: Jul 20 2018 12:02PM | Last Updated: Jul 20 2018 12:02PMजळगाव : मुक्ताईनगर 

येथील नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने यश संपादन केले आहे. १७ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले तर एका अपक्षाने देखील विजय मिळविला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच भाजपाने यशाचा पल्ला गाठण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी या विजयी झाल्या आहेत.