Sun, Aug 18, 2019 06:36होमपेज › Vidarbha › गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्‍या 

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्‍या 

Published On: Feb 02 2019 2:19PM | Last Updated: Feb 02 2019 2:45PM
गडचिरोली : पुढारी ऑनलाईन 

गडचिरोली येथे शनिवारी (ता. १) नक्षलवाद्यांनी दोघांची हत्‍या केली. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन या दोन ग्रामस्थांची हत्‍या केल्‍याची माहिती मिळाली आहे. गेल्‍या १५ दिवसात नक्षलवाद्यांकडून मारले गेलेल्‍या नागरिकांची संख्‍या ७ झाली आहे. कोरखेडा, कोरची,पेटगाव या गावजवळ दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी गाड्‍या जाळल्‍या होत्‍या. त्‍यानंतर ही घटना घडली. 

गडचिरोली येथील भामरागड येथे नक्षलवाद्यांनी तिघांचा निर्घूण हत्या केल्‍याची घटना २२ जानेवारीला घडली होती. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून या तिघा ग्रामस्थांची हत्या केली होती. कसनासूर गावात घुसलेल्या नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांना प्रथम शस्त्राचा धाक दाखविला आणि त्यानंतर तिघांची हत्या केली. या तिघांच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात एक बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले होते की, २२ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या घटनेत आमचे ४० जण मारले गेले. या घटनेतील दोषी कसनासूर गावातील  मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी या पोलिसांच्या खबऱ्यांना आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.