Mon, Jul 06, 2020 18:45होमपेज › Vidarbha › हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंची जोरदार बॅटींग

हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंची जोरदार बॅटींग

Published On: Feb 16 2018 6:31PM | Last Updated: Feb 16 2018 7:01PMअकोला : पुढारी ऑनलाईन

मोदी सरकारने सत्तेत येण्याआधी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले होते. यावर बोलताना, अच्छे दिनची टिंगल होऊ लागली आहे. ‘अच्छे दिन का जुमला हमारे गले की हड्डी बन गया है’ असे खुद्द केंद्रातले मंत्रीच म्हणतात असे मुंडे म्हणाले. मराठवाड्यात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पंतप्रधान मोदी म्हणायचे की काळा पैसा परत आणणार. आता मोदी कुठेही जाताना व्हाया स्वित्झर्लंड जातात मग काळा पैसा का आणत नाहीत? अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. देशभरात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ६ करोड शौचालये बांधणार पण, महागाई इतकी वाढली की लोकांना खायला अन्न मिळत नाही. मोदींनी आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘खाएगा इंडिया तोही जाएगा इंडिया’ असेही ते म्हणाले. 

यंदाच्या अर्थसंकल्पावर धनंजय मुंडेंनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. मोदी सरकारवर व्यापारीवर्ग खूश होता. पण, जीएसटी आल्याने व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  आता मोदींचे भाषण सुरू झाले तरी व्यापारी शटर बंद करतात अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

नगर जिल्ह्यातील उपमहापौरांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चूकीचे असल्याचे सांगत, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक व्यक्तव करणाऱ्या नगरच्या उपमहापौराचा जाहीर निषेध केला. अशा विकृत प्रवृत्तीवर सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.