Fri, Jun 21, 2019 01:49होमपेज › Vidarbha › नागपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

नागपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

Published On: Jun 11 2018 9:19AM | Last Updated: Jun 11 2018 9:19AMनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूरमधील दिघोरी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि वृद्धेचा समावेश आहे. दिघोरीतील आराधना नगरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

आराधना नगरात राहणारे कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची झोपेत असताना हत्या करण्यात आली. मृतांमध्ये पवनकर यांच्यासह त्यांची पत्नी अर्चना, मुलगी वेदांती, भाचा गणेश आणि आई मीराबाई यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. 

पवनकर हे प्रॉपर्टीचा व्यवसाय करत असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. पवनकर हे भाजपचे कार्यकर्ते असून,  त्यांच्या हत्येचे वृत्त कळताच त्यांनी आराधना नगरात गर्दी केली आहे.