Fri, Jun 05, 2020 01:16होमपेज › Vidarbha › पसंत नव्हता म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशीच 'तिने' त्याला भोकसले

पसंत नव्हता म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशीच 'तिने' त्याला भोकसले

Published On: May 11 2019 1:42PM | Last Updated: May 11 2019 1:42PM
भंडारा : पुढारी ऑनलाईन

आपल्याल पसंत नसलेल्या मुलाशी लग्न करावे लागू नये म्हणून तिने चक्क त्याचा खुन केला. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली या ठिकाणी घडली. मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून हे क्रूरकृत्य केले असल्याचे समोर आले आहे. विनोद कुंभारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रिना मडावी आणि प्रफुल्ल परतेती अशी आरोपींची नावे आहेत.

तुमसर तालुक्यातील येरली या गावातील विनोद कुंभारेचे लग्न तिरोडा तालुक्यातील कोयलारी या गावातील रिना मडावी या मुलीसोबत ठरले. मात्र, तिला विनोदसोबत लग्न करायचे नव्हते. तिचे गावातीलच प्रफुल्ल परतेती याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या वडिलांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे रिनाच्या वडिलांनी तिचे लग्न विनोदसोबत ठरवले होते. 

दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने रिनाला ते मान्य नव्हते. हे लग्न करावे लागू नये म्हणून रिनाने आपल्या प्रियकराचे मदतीने विनोदला लग्नाच्या आदल्यादिवशी गावाबाहेर भेटण्यास बोलावले. त्यावेळी दोघांनी मिळून विनोदच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. यावरच ती थांबली नसून त्याचा मृतदेह गावाशेजारील जंगलात फेकला.

खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मुलीच्या गावी म्हणजे कोयलारी येथे चौकशी केली. गावामध्ये प्रफुल्ल आणि रिनाचं प्रेमप्रकरण असल्याची माहिती मिळाली . या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. होणारा नवरा पसंत नव्हता, तसेच प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याने हत्या केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली.