Sun, Apr 21, 2019 05:41होमपेज › Vidarbha › पोटच्या गोळ्याला वाघाच्या तोंडातून बाहेर काढले

पोटच्या गोळ्याला वाघाच्या तोंडातून बाहेर काढले

Published On: Nov 07 2018 1:33AM | Last Updated: Nov 06 2018 11:03PMनागपूर : प्रतिनिधी

वाघ पोटच्या गोळ्याला फरफटत असताना आई-वडील धाडस करून त्याच्या बचावासाठी धावले. त्यानंतर वाघाने पळ काढल्याने चिमुकल्याचा जीव वाचला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे घडली. या घटनेनंतर या गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात मागील काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी हनवते कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते. यावेळी वाघाने आदर्शवर हल्‍ला करून फरफटत नेणे सुरू केले.  वडील विकास आणि आईने आराडओरड करीत वाघाच्या दिशेने धाव घेतली.