Sat, Jul 04, 2020 18:32होमपेज › Vidarbha › नागपूर : कोरोना रुग्णसंख्या सहाशेच्या उंबरठ्यावर

नागपूर : कोरोना रुग्णसंख्या सहाशेच्या उंबरठ्यावर

Last Updated: Jun 03 2020 3:07PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ६०० च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी नागपुरात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेल्या २२ संशयीत रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नवीन रूग्णांसह नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ५९७ एवढी झाली आहे. 

अधिक वाचा : निसर्ग चक्रीवादळ कोरोनाग्रस्त महामुंबईच्या दिशेने अग्रेसर!

आतापर्यत नागपुरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३९४ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नागपुरात १९२ अॅक्टीव्ह रूग्ण वैद्यकिय महाविद्यालय आणि मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. नागपुरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, मोमीनपुरा, लकडगंज, आसीनगर या भागात मंगळवारी कोरोनाचे हे नवीन रूग्ण वाढले आहेत.