होमपेज › Vidarbha › गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाचा मुलीवर बलात्कार

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाचा मुलीवर बलात्कार

Published On: Apr 20 2019 1:55AM | Last Updated: Apr 20 2019 1:23AM
नागपूर : प्रतिनिधी

उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून मुलीवर अत्याचार करणार्‍या ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका 17 वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अत्याचार केला. त्या ढोंग्याला आता तुरूंगाची हवा खावी लागली आहे.

गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याला घेऊन त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका 17 वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी 27 मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली. त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. 27 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पिडीत मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत असलेल्या त्या पिडीतेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पिडीतेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते.  त्यामुळे तिची मावशीही त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पिडीतेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगी बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी 8-8 वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. 1 ते 4 एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने बळजबरी केली.