Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Vidarbha › राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; राधाकृष्ण विखे-पाटील

Published On: Dec 10 2017 5:52PM | Last Updated: Dec 10 2017 5:52PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे, असा आरोप करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वीच्या चहपानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्य सरकरकडे विकास कामांसाठी निधी नाही. अनेक विकासकामांचा निधी कमी करुन तो पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वळवला जात आहे. तिजोरीत खडखडात असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रद्द करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.

सरकारने आतापर्यंत साडे चार लाख कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी घेतले? आतापर्यंत पंधरा लाख शेतकऱ्यांना कशाप्रकारे कर्जमाफी दिली? याचा विरोधकांनी सरकारकडे हिशोब मागितला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.