Wed, Jun 19, 2019 08:42होमपेज › Vidarbha › राम मंदिराला नरेंद्र मोदींचाच अडथळा : प्रवीण तोगडिया

राम मंदिराला नरेंद्र मोदींचाच अडथळा : तोगडिया

Published On: Oct 08 2018 1:26AM | Last Updated: Oct 08 2018 10:12AMनागपूर : प्रतिनिधी

अयोध्येत राम मंदिर बनवण्याच्या कामात सवार्र्ंत मोठा अडथळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. 

राम मंदिराच्या मुद्द्यावरून आतंरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी नरेंद्र मोदींवर चांगलाच निशाणा साधला. राम मंदिराच्या निर्माण कार्यात मोदीच मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मोदींना रामाचे फकीर बनवून पाठवले, पण ते मुस्लिमांचे वकील बनले असल्याचे तोगडिया म्हणाले. 

21 ऑक्टोबरला अयोध्येकडे कूच 

गेल्या 32 वर्षांपासून आम्ही राम मंदिराबाबत संसदेत कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमचा विश्‍वासघात केला असल्याचेही तोगडिया म्हणाले. आम्ही लखनौवरून 21 ऑक्टोबरला अयोध्येकडे कूच करणार आहोत. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागातून रामभक्त येणार आहेत. सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची असूनही राम मंदिराबाबत निर्णय होत नाही. संघानी राम मंदिराबाबत कायदा तयार करण्याचे आदेश देणे गरजेचे असल्याचेही तोगडिया म्हणाले.