Sun, Jul 05, 2020 11:51होमपेज › Vidarbha › गडचिरोलीत ३ कोरोना बाधितांची भर

गडचिरोलीत ३ कोरोना बाधितांची भर

Last Updated: May 29 2020 2:18PM
नागपुर : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात सर्वात टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर चिंता वाढली आहे. शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या तीन संशयीतांचा आहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३१ झाली आहे.  आज आढळलेले रूग्‍ण हे मुलचेरा व अहेरी तालुक्यातील असून, ते मुंबई  येथून आले होते.

यापुर्वी गडचिरोली जिल्हयातील कोरोनाबाधीतांची रूग्णसंख्या २८ एवढी होती. मात्र ५ रूग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्षात २३ रूग्णांवर उपचार सुरू होते. मात्र आज शुक्रवारी आणखी ३ रूग्ण वाढल्याने गडचिरोलीतील प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता २६ इतकी झाली आहे

अधिक वाचा : मुंबईतील ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

वर्धा येथे एक रूग्ण दगावला

वाशीम येथील कोरोनाबाधित रूग्णाचा वर्धेतील सेवाग्राम रूग्णालयात शुक्रवारी पहाटे २ वाजता  मृत्यू झाला. ८ मे रोजी हा रूग्ण हृदय रोगाच्या उपचारासाठी सावंगी येथे  दाखल झाला होता. सोबतच पॅरालिसिस आणि  बीपी या आजारानेही त्रस्त होते. १० मे रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सेवाग्राम  येथील कस्तुरबा रूग्णालायत  पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले होते. 

अधिक वाचा : देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक!

या ६३ वर्षीय रूग्णाची प्रकृती मागील ८ दिवसांपासून  गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सुद्धा लावण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आज पहाटे दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धेतच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.