Thu, Jul 16, 2020 18:29होमपेज › Vidarbha › ‘चाय पे चर्चा’ फेम शेतकर्‍याची आत्महत्या

‘चाय पे चर्चा’ फेम शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 13 2017 7:54AM | Last Updated: Dec 13 2017 7:53AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चाने संपूर्ण देशात प्रसिद्धीस आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील कैलास किसन मानकर या तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. कैलासकडे स्वत:ची तीन एकर शेती असून, यंदा पाच एकर शेती मक्त्याने घेतली होती. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कैलासने विष प्राशन केले. दाभडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी 20 मार्च 2014 रोजी चाय पे चर्चा कार्यक्रम घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्याचे आश्‍वासन दिले होते. विशेष म्हणजे, दाभडी गावाची निवड सर्वाधिक शेतकरी आत्महत्येमुळेच करण्यात आली होती. आतापर्यंत दाभडीत 17 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.