Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Vidarbha › आठवी पर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य : तावडे

आठवी पर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य : तावडे

Published On: Jan 11 2019 7:21PM | Last Updated: Jan 11 2019 7:27PM
यवतमाळ : पुढारी ऑनलाईन 

इंग्रजी शाळेत आठवी पर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य असल्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.  यवतमाळ येथे सुरू असलेल्या ९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना तावडे यांनी हे सांगितले. तावडे यांच्या भाषणावेळी उपस्थितानी मोठा गोंधळ घातला. मात्र आपल्या भाषणाशी या गोंधळाचा संबंध नसल्याचे तावडेंनी स्पष्ट केले.  

यावेळी तावडे म्हणाले, नवी पिढी ही सायबर गुलाम झाली आहे. या विद्यार्थांना साहित्यिकांनी सायबर विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन तावडे यांनी केले. तर याबरोबरच साहित्य महामंडळाला वर्षभरात ७० लाखांची मदत दिली असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. 

तर साहित्य संमेलनात जो वाद सुरू आहे त्या वादाशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे तावडे म्हणाले. तर संमेलनाला कुणाला बोलवावे किंवा कुणाला बोलवू नये यामध्ये सरकार कधीही हस्तक्षेप करत नाही. मात्र तरीही या वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवणं चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. 

तावडे यांच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावर तावडे यांनी या गोंधळाचा भाषणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.