Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Vidarbha › सामान्यांचा बळी घेणारे हे तर फसणवीस सरकार

सामान्यांचा बळी घेणारे हे तर फसणवीस सरकार

Published On: Nov 09 2017 2:17AM | Last Updated: Nov 09 2017 1:02AM

बुकमार्क करा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

वीज निर्णय फिरविणारे, शेतकरी जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार फसणवीस सरकार असल्याची घणाघाती टीका काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी अमरावती येथे काँगे्रसच्या जनआक्रोश मेळाव्यात मार्गदर्शन करताना केली. अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला कार्यकर्ते, शेतकरी आणि सामान्यजनांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.

श्रीमंतांच्या मर्सिडिज या आलिशान वाहनासाठी सहा टक्के दराने जीएसटी आकारणारे हे सरकार शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरवर 28 टक्के जीएसटी आकारते. विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस आघाडी शासनावर खुनाचे गुन्हे नोंदविण्याची मागणी करायचे. आता फडणवीसांच्या राज्यात शेतकर्‍यांच्या 12 हजार आत्महत्या झाल्या आहेत. फडणवीसांविरुद्ध 302 कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.

आमचे सरकार असताना आम्ही शेतकर्‍यांना क्षणात कर्जमाफी दिली. जीएसटीची कल्पना काँगे्रसची होती. काँगे्रस सत्तेत असताना मोदींनी विरोध केला. ते सत्तेत आल्यावर जगातील अनेक देशांमध्ये असा कर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि काँगे्रसचा योग्य तयारीचा सल्ला धुडकावून घिसाडघाईने जीएसटी लागू केला. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी भाकीत केल्याप्रमाणे दोन टक्क्यांनी विकास दर घसरला, अशा शब्दांत मोदी सरकारचे अपयश पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड केले.