Sun, Dec 08, 2019 06:13होमपेज › Vidarbha › चुकीचा मार्ग सोडा, अन्यथा गय नाही : मुख्यमंत्री

चुकीचा मार्ग सोडा, अन्यथा गय नाही : मुख्यमंत्री

Published On: Aug 06 2019 1:49AM | Last Updated: Aug 25 2019 1:56AM
गडचिरोली : विशेष प्रतिनिधी

नक्षलवादी कारवाया मोडीत काढण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करीत आहे.  आता नक्षलींविरोधात निर्णायक लढाई सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. नक्षलवाद्यांनी चुकीच्या मार्गाने न जाता मुख्य प्रवाहात सामील व्हावे, अन्यथा कठोर  कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी येथील सभेत दिला. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून एक मे रोजीची घटना वगळता  अन्य काही घडलेले नाही. पोलिसांनी प्रभावी पावले उचलल्यामुळे नक्षलवाद आटोक्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी 

या वेळी सांगितले. एक ऑगस्टपासून सुरू झालेल्या महाजनादेश यात्रेत 670 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे.  एकूण 30 मतदारसंघ आणि सहा जिल्ह्यांत यात्रेने प्रवास पूर्ण केला. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात रेल्वे सेवा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पूल व अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

धरणांतून मोठा विसर्ग

राज्यातील अनेक धरणे भरल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.  मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबाद या भागांत पाऊस नाही. जायकवाडीत जोत्याखाली पाणी होते. पण नगर, नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडीत 15 टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.