Sat, Jun 06, 2020 12:12होमपेज › Vidarbha › चंद्रपूर : वडील आणि भावाकडून मुलीच्‍या प्रियकराची हत्‍या

चंद्रपूर : वडील आणि भावाकडून मुलीच्‍या प्रियकराची हत्‍या

Published On: May 13 2019 10:20AM | Last Updated: May 13 2019 10:20AM
चंद्रपूर : पुढारी ऑनलाईन 

महाराष्‍ट्रातील चंद्रपूर जिल्‍ह्‍यात ऑनल किलिंगचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला. महाराष्ट्रात प्रेमप्रकरणातून हल्ला किंवा हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलीच्‍या वडिलाने आणि भावाने मिळून मुलीच्‍या प्रियकराची हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. हत्‍या झालेल्‍या तरुणाचे नाव योगेश जाधव आहे. हा तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथला रहिवासी होता.

योगेश जाधव हा घुग्घुसचा राहणारा होता. त्‍याचे घुग्घुस येथील मुलीसोबत प्रेमसंबध होते. योगेशला रविवारी त्याच्या मैत्रिणीने भेटायला बोलवले होते. पण यापूर्वीच प्रभुदास धुर्वै आणि क्रिष्णा धुर्वै या बाप लेकाने त्‍याला जबरदस्‍तीने दुचाकीवर बसवून यवतमाळ जिल्‍ह्‍याच्‍या हद्दीत निलजईच्या जंगलात घेऊन गेले. त्‍याठिकाणी त्याला बेदम मारहाण करुन दगडाने ठेचून योगेशची हत्या केली.

या झालेल्‍या प्रकारानंतर या बाप लेकाने रात्री उशिरा घुग्घुस पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. याप्रकरणी आता पोलिस पुढील तपास करत आहेत.