Sat, Jul 04, 2020 21:23होमपेज › Vidarbha › देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार!

देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार!

Last Updated: Nov 15 2019 1:32AM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात सरकार स्थापनेची वाट अजूनही मोकळी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर नितीन गडकरी मुख्यमंत्री बनणार, अशा अटकळी येथे सुरू झाल्या होत्या. मात्र गुरुवारी नागपुरात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘मी दिल्लीत खूश आहे आणि मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार स्थापन होईल’, असे स्पष्ट करून या अटकळींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
विमानतळावर गडकरी उतरले तसे माध्यमांचा गराडा त्यांच्याभोवती पडला. मी मुंबईत परतण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. इथे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार बनेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गडकरी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी नियोजित भेटीबाबत सांगितले की, त्यांची भेट मी घेतच असतो. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या पेचाचा या भेटीशी काहीही संबंध नाही. पेचही लवकरच संपेल. शिवसेनेशी संवाद सुरू आहे.

याआधी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय किशोर तिवारी यांनी सरसंघचालक भागवत यांना पत्र लिहून पेच सोडविण्याची जबाबदारी गडकरींना सोपविण्यात यावी, असे सुचविले होते.
संघाचा युतीच्या तिढ्याशी संबंध नाही

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तिढा सोडविण्याशी काहीही संबंध नाही. आमचे निर्णय सर्वस्वी भाजप करीत असतो. भाजपने आपला निर्णय केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार.

मी दिल्लीत खूश : गडकरी

महाराष्ट्रात सरकार स्थापनेची वाट अजूनही मोकळी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर नितीन गडकरी मुख्यमंत्री बनणार, अशा अटकळी येथे सुरू झाल्या होत्या. मात्र गुरुवारी नागपुरात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘मी दिल्लीत खूश आहे आणि मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार स्थापन होईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.

विमानतळावर गडकरी उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.  मी मुंबईत परतण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. इथे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार बनेल, असे ते म्हणाले. गडकरी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी नियोजित भेटीबाबत सांगितले की, त्यांची भेट मी घेतच असतो. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या पेचाचा या भेटीशी काहीही संबंध नाही.