Fri, Jan 24, 2020 16:48होमपेज › Vidarbha › गायी जन्माला घालण्याचा कारखाना काढू : गिरिराज सिंह

गायी जन्माला घालण्याचा कारखाना काढू : गिरिराज सिंह

Published On: Sep 02 2019 1:37AM | Last Updated: Sep 02 2019 12:20AM
नागपूर : वृत्तसंस्था 

गाय जन्माला घालण्याचा कारखाना काढू. भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञानाने केवळ गायीच जन्माला येतील. यामुळे मॉब लिंचिंगसारख्या घटनाही थांबतील आणि शेतकर्‍यांचाही फायदा होईल, असे वक्तव्य नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारे केंद्रीय पशुपालनमंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. नागपूर येथे मदर डेअरीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

गिरिराज म्हणाले की, विदर्भातील गायी लहान असतात आणि केवळ एक ते दोन लीटर दूध देतात. येत्या काळात गायीच्या पोटी केवळ गायच जन्माला येईल. सॉर्टिंग सिमेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शक्य होईल. त्यामुळे मॉब लिंचिंग होणार नाही आणि भटकी जनावरेही उपयोगाची ठरतील. त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. 

यावर्षी आमचे लक्ष्य 30 लाख गायींची पैदास करण्याचे आहे. 2025 पर्यंत 10 कोटी गायींची पैदास होईल. ज्या गायी दूध देत नाहीत, त्या गायींमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 20 लीटर दूध देण्याची क्षमता निर्माण केली जाईल. त्यामुळे जगभरात सर्वाधिक स्वस्त दूध भारतात मिळेल, असा दावाही गिरिराज सिंह यांनी केला.