Wed, Jun 19, 2019 08:40होमपेज › Vidarbha › मराठी साहित्य संमेलन : व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला : वैशाली येडे 

मराठी साहित्य संमेलन : व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला : वैशाली येडे 

Published On: Jan 11 2019 6:46PM | Last Updated: Jan 11 2019 6:46PM
यवतमाळ : पुढारी ऑनलाईन 

यवतमाळ येथे ९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली सुधारक येडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्यांनी या आधी तेरवं नाटकात काम केले आहे. वैशाली येडे यांनी उद्घाटन भाषणातून व्‍यवस्‍थेवर परखड टीका केली. 

या भाषणात वैशाली येडे म्‍हणाल्या की, पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली. तसेच मी हीच वायद्याची शेती माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला. साहित्‍यानेच जगायला शिकवले. 

जगरहाटीने विधवापण लादल्याची आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली यांनी या भाषणातून व्‍यवस्‍थेवर टीका केली. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. यापूर्वी, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांची निवड करण्यात आली होती. मात्र, निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याने मोठा वाद उफाळला. यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला.