होमपेज › Vidarbha › चंद्रपूरच्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 

'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 

Last Updated: Mar 01 2020 1:01AM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर येथील दारूबंदीच्या विषयावर मागविण्यात आलेल्या मतांमध्ये सुमारे ९३ टक्के निवेदने ही दारूबंदीच्या विरोधात आलेली आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

 विदर्भातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा आलिशान बंगला अखेर केला जमीनदोस्त (video)

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबत समीक्षा समिती गठीत करण्यात आली होती. दारूबंदी लागू झाल्यानंतर या निर्णयाचा जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये झालेले परिणाम आणि बदल यांची समीक्षा करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात आली. समितीला लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. ही समिती जिल्हास्तरीय असून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ या विषयाची समीक्षा करण्यासाठी तयार झालेली आहे. या समितीला निवेदन देण्याची मुदत मंगळवारी (दि. २५) संध्याकाळी ६ वाजता संपली. यावेळी समीक्षा समितीकडे पावणे तीन लाखांच्या आसपास जनतेची निवेदने प्राप्त झाली आहे. समितीला एकूण २ लाख ८२ हजार ४१२ निवेदने मिळाली.

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रेल्वे रोखली

यातील जवळपास २० हजार ८०० निवेदने दारुबंदीच्या समर्थनार्थ तर २ लाख ६२ हजार निवेदने दारुबंदीच्या विरोधात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात सरासरी ९३ टक्के निवेदने दारूबंदीच्या विरोधात आहेत.

समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगर पालिका चंद्रपूरचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर दोमकर यांचा समावेश आहे.

कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास नागपुरात सुरुवात