Tue, Sep 17, 2019 04:00



होमपेज › Vidarbha › भंडाराः कंटेनरने वऱ्हाड्यांना चिरडले; ८ जण ठार

भंडाराः कंटेनरने वऱ्हाड्यांना चिरडले; ८ जण ठार

Published On: May 01 2018 8:30AM | Last Updated: May 01 2018 8:30AM



भंडारा : पुढारी ऑनलाईन

लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना भंडारा जिल्यातल्या लाखनी तालुक्यात घडली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. या लॉनसमोर २० ते २५ वऱ्हाडी लग्‍न लागल्‍यानंतर महामार्गाच्या कडेला उभे असताना रायपूरच्या दिशने येणाऱ्या कंटेनरने त्‍यांना चिरडले. यात ८ जणांचा जागीच मृत्‍यू झाला, १३ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून, त्‍यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

लाखनी तालुक्यातल्या जगनाडे कुटुंबीयांचा हा लग्न सोहळा होता. नागपुरातील हारगुडे कुटुंबीय या विवाहासाठी वऱ्हाड घेऊन आले होते. दरम्‍यान, ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, संतप्त नागरिकांनी ट्रेलची तोडफोड करीत चक्काजाम आंदोलन केले. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्‍य लाठीमार केला. 

Tags : bhandara, accident 


 





WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex