Mon, Jul 06, 2020 00:58होमपेज › Vidarbha › अकोल्यात ३० नवे पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ७५६ 

अकोल्यात ३० नवे पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ७५६ 

Last Updated: Jun 06 2020 9:27PM

File Photoनागपूर : पुढारी वृत्तसेवा

विदर्भातील अकोला जिल्ह्यात कोरोना वाढीचा वेग शनिवारी सुध्दा कायम होता. शनिवारी (दि. ६) अकोल्यात एकाच दिवशी ३० नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. मागील दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग अकोल्यात झपाट्याने वाढला असून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ७५६ एवढी झाली आहे.

अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत रूग्ण संख्या सातशेच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. सरासरी दरदिवशी ११ नवे रूग्ण अकोल्यात आढळले. अकोल्यात शनिवारी (दि. ६) सकाळी आणि संध्याकाळी मिळून कोरोना संसर्ग तपासणीचे १०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ७५६ झाली आहे.  यापैकी ३६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ५३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १८९ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित गंगानगर जुनेशहर,  गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट, जेतवननगर खदान, भारती प्लॉट, गणेशनगर, व्यंकटेशनगर, जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.

दरम्यान, आज दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण ७० वर्षीय पुरुष असून हा रुग्ण गुलजारपुरा येथील रहिवासी आहे.  हा रुग्ण  दि. ३ रोजी दाखल  झाला होता. आज उपचार घेताना तो मयत झाला. तर अन्य रुग्णही ४० वर्षीय महिला असून ती शरीफ नगर जुने शहर येथील रहिवासी आहे. ही महिला दि.२७ मे रोजी दाखल झाली होती.  तिचा आज दुपारून उपचार घेताना मृत्यू झाला.
तसेच आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १८ जणांना संस्थागत अलगीकरणात  निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.