Sun, Jul 05, 2020 13:20होमपेज › Vidarbha › गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९ रुग्ण

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९ रुग्ण

Last Updated: May 25 2020 7:38PM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा

संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग सुरू असताना कोरोनामुक्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी गडचिरोलीत एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र मागील आठ दिवसातच गडचिरोलीतील कोरोनाच्या रूग्णांची संख्या २४ वर पोहोचली आहे. 

सोमवारी गडचिरोली येथे नव्याने ९ रूग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता रूग्णांची संख्या २४ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व ९ रूग्ण मुंबई हून प्रवास करून गडचिरोलीत पोहोचले होते. त्यांना गडचिरोलीत प्रवेश करताच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य आजाराने आता गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रवेश केला आहे. 

 गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात रविवारी रात्री दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती प्रशासनाकडून रात्री  देण्यात आली होती. सोमवारी आढळून आलेले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबईमधून प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले होते. या सर्वांना एटापल्ली येथे संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.