होमपेज › Sports › शेन वॉर्नला सेहवागच्या हटके शुभेच्छा

अतरंगी विरूचे अतरंगी ट्विट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुढारी ऑनलाईन
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा कायमच आपल्या अतरंगी ट्विटसाठी ओळखला जातो. आजही, तो एका हटके ट्विटमुळे चर्चेत आला आहे. 
यावेळी त्याने आपल्या खास शैलीत ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवागने त्याचा आणि शेन वॉर्नचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शेन वॉर्नच्या हाताला दुखापत झाली होती, त्यावेळचा तो फोटो आहे. सेहवाग पुढे लिहितो, 'फलंदाज ज्या ज्या वेळी तुझ्यासमोर फलंदाजीसाठी उभा राहत असे, त्याला तुझा हात असाच प्लास्टर मध्ये असावा असे वाटत असे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महान शेन वॉर्न'.
सेहवागने असेच एक ट्विट इशांत शर्मासाठी केले होते. त्यात त्याने त्याला जगातील सर्वांत उंच इमारतीची 'बुर्ज खलिफा'ची उपमा दिली होती .