Sun, Oct 20, 2019 05:52होमपेज › Sports › ट्रोलिंगला विराटचे ‘आक्रमक’ उत्तर 

ट्रोलिंगला विराटचे ‘आक्रमक’ उत्तर 

Published On: Nov 09 2018 7:13PM | Last Updated: Nov 09 2018 7:15PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. विराटने त्याच्या ॲपवर एका क्रिकेट चाहत्याने विराटच्या फलंदाजीवर तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर तापट विराटने त्याला भारत सोडून जाण्यास सांगितले त्यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. या वादंगावर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

विराटला उद्येशून एका क्रिकेट चाहत्याने ‘मला भारतीय फलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या फलंदाजांची फलंदाजी पाहण्यास मजा येते.’ असे खोचक वक्तव्य केले होते. याच्याच जोडीला त्याने विराटला ‘अवास्तव महत्व दिलेला फलंदाज, व्यक्तीशः मला याच्या फलंदाजीत खास असे काही जाणवत नाही.’ असे म्हणत विराटला डिवचले होते. त्याला  तापट स्वभावाच्या विराटने  ‘मला वाटते की तू भारत सोडून जावेस. तू का आमच्या देशात राहतोस आणि दुसऱ्या देशावर प्रेम करतोस? मी तुला आवडत नाही याच्याशी मला काही देणे घेणे नाही. पण तू आमचा देश सोडला पाहिजेस. तू तुझ्या प्रथमिकता दुरुस्त कर.’ अशी प्रतिक्रिया दिली होती. 

विराटच्या या प्रतिक्रियेवर जोरदार टीका झाली तो ट्रोलही झाला. त्यानंतर त्याने या ट्रोलिंगला ट्विट करुन उत्तर दिले. त्याने ‘मला वाटते की ट्रोलिंग माझ्यासाठी नाही. ट्रोल होण्यावर मी ठाम आहे. मी त्या वक्तव्यातील ‘हे भारतीय’ या बद्दल बोललो आहे. मला निवडीचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही पेटवण्याचा आनंद घेत रहा दिवाळीचा मौसम आहे. सर्वांना प्रेम आणि शांतता.’ असा ट्विट केला आहे.  

विराटच्या या ट्विटमुळे त्याला त्याच्या वक्तव्याचे कोणेतही दुखः नसल्याचे जाणवते. विराटच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ‘सहिष्णुता’ या शब्द प्रयोगाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.