Wed, Jul 24, 2019 14:01होमपेज › Sports › इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ वापरणार ऑरेंज जर्सी?

इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ वापरणार ऑरेंज जर्सी?

Published On: Jun 20 2019 10:31PM | Last Updated: Jun 21 2019 1:11AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघांमध्ये 30 जूनला सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ ‘ऑरेंज जर्सी’ वापरणार असल्याचे वृत्त आहे.

आतापर्यंत भारताने विश्‍वचषकात निळ्या रंगाच्या शेडस्च्या जर्सी परिधान केल्या आहेत. भारताने विश्‍वचषकात निळा रंग बदललेला नाही; पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय संघ ‘ऑरेंज जर्सी’ परिधान करणार आहे. या गोष्टीचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची आहे. एका सामन्यात दोन्ही संघ सारख्या रंगाची जर्सी वापरू शकत नाहीत, असे संकेत आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ ‘ऑरेंज जर्सी’ परिधान करणार असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांचे रंग एक सारखे असले तरी नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सूट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.