Sun, Jul 05, 2020 13:50होमपेज › Sports › गब्बर म्हणतो निवृत्तीनंतर 'हे' काम अधिक चांगलं करू शकतो!

गब्बरने सांगितला निवृत्तीनंतरचा प्लॅन!

Last Updated: May 27 2020 11:15AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा सलामीवीर शिखर धवन उर्फ गब्बरने आपल्या निवृत्तीच्या योजनेबाबत खुलासा केला आहे. त्यांने आपण निवृत्तीनंतर समालोचनाचे काम उत्तम प्रकारे करु शकतो कारण आपली विनोदबुद्धी चांगली आहे असे सांगितले. हे वक्तव्य त्याने भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याच्याबरोबर केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केले. 

शाळा, कॉलेज सुरु करण्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा खुलासा

शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांनी नुकतेच इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. त्यात शिखर धवनने आपल्या निवृत्तीनंतरच्या नियोजनावर भाष्य केले. तो म्हणाला 'माझ्या विनोदबुद्धीच्या क्षमता पाहता मी उत्तम समोलोचक होऊ शकतो मी याच पेशाची निवड करेन. मी हिंदीचा चांगला समालोचक होऊ शकतो कारण माझी विनोदबुद्धी चांगली आहे. याचबरोबर मी एक मोटिव्हेशनल स्पिकरही बनू शकतो. मी माझी बासुरी त्यावेळी वापरु शकतो. मी माझ्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करुन लोकांना प्रभावित करु शकतो.'

देशांतर्गत विमानसेवा सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत विमानातच सापडला कोरोनाग्रस्त!

शिखर धवन आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक होता पण, कोरोना महामारीमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. शिखरने भारताकडून अखेरचा सामना जानेवारी महिन्यात खेळला होता. त्याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले होते. 34 वर्षाच्या धवनने भारताकडून आतापर्यंत 34 कसोटी 136 एकदिवसीय आणि 61 टी - 20 सामने खेळले आहेत. धवनने सर्व फॉरमॅटमध्ये 9 हजार 591 धावा केल्या आहेत.