Wed, Jul 24, 2019 15:08होमपेज › Sports › शिखर म्हणतो ‘बाप शेर तो बेटा सवा शेर’!

शिखर म्हणतो ‘बाप शेर तो बेटा सवा शेर’!

Published On: Jun 16 2019 10:15AM | Last Updated: Jun 16 2019 8:46PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत- पाकिस्तान यांच्यात आज, रविवारी (दि. 16) सामना होत आहे. सामन्यापूर्वीच क्रिकेटप्रेमींमध्ये दोन्ही देशांकडून सोशल वॉर सुरू आहे. सोशल वॉरमध्ये भारत पाकिस्तान सामन्याबाबत कोण कोणाचा बाप ही चर्चा सर्वत्र असताना भारताचा गब्बर म्हणजेच सलामीवीर शिखर धवनने 'फादर्स डे'चे औचित्य साधून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करुन जायबंदी झालेला सलामीवीर शिखर भारत-पाकिस्तान सामन्यात खेळणार नसला तरी मैदानाबाहेरुन धवनचा ‘खेळ’ सुरू आहे. गौरव कपूर सोबत झालेल्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या यु-ट्यूबरील कार्यक्रमाच्या व्हिडिओचा एक भाग धवनने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

यामध्ये धवनसोबत रोहित शर्मा आणि धवनचा मुलगा झोरावर हा देखील आहे. गौरव कपूर झोरावरला, तू चांगला फलंदाज आहेस की तुझे वडील असा प्रश्न विचारताच त्यावर झोरावर दोघांपैकी कुणाचे नाव न घेता रोहित शर्माकडे बोट दाखवतो. हा व्हिडिओ शेअर करत धवनने बाप शेर तो बेटा सवा शेर’! अशी कॅप्शन दिली आहे.