Sun, Mar 24, 2019 02:17होमपेज › Sports › नकोसा वाटणारा विक्रम के.एल. राहुलच्या नावावर!

नकोसा वाटणारा विक्रम के.एल. राहुलच्या नावावर!

Published On: Mar 13 2018 6:18PM | Last Updated: Mar 13 2018 6:26PMकोलंबो : पुढारी आनलाईन 

भारताचा कसोटीतील सलामीवीर के.एल. राहुलने टी-२० सामन्यात एक अनोखा विक्रम केला. त्याने रिषभ पंतच्या जागी संधी मिळाल्यानंतर राहुल संधीचे सोने करत काही कमाल करेल असे वाटत होते. पण, त्याने धावांचा विक्रम करण्याऐवजी बाद होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 

निदास चषक तिरंगी टी-२० मालिकेतील श्रीलंकेबरोबरच्या दुसऱ्या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यावर राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो १८ धावांवर खेळत असताना फिरकीपटू जीवन मेंडीसचा चेंडू बॅकफूटवर येवून खेळण्याच्या नादात त्याचा मागील पाय यष्टींना लागला आणि बेल्स पडल्या. त्यामुळे राहुल हिट विकेट झाला. टी-२० मध्ये हिट विकेट होणारा राहुल हा भारताचा पहिलाच फलंदाज आहे. त्यामुळे टी-२०त भारताकडून हिट विकेटचा शुभारंभ करण्याचा मान के.एल. राहुलला मिळाला आहे. याचबरोबर राहुल टी-२० हिट विकेट होणारा जगातील तो १० खेळाडू ठरला आहे.

 

या आधी सचिन तेंडूलकर, विराट कोहलीही वनडेत हिट विकेट झाले आहेत.  सचिन २००८ मध्ये अशाप्रकारे हिट विकेट झाला होता. तर विराट कोहली २०११ ला इंग्लंड विरुध्द हिट विकेट झाला होता.