Wed, Nov 21, 2018 19:52होमपेज › Sports › INDvWI: तिसऱ्या टी-20साठी भारतीय संघाची घोषणा

तिसऱ्या टी-20साठी भारतीय संघाची घोषणा

Published On: Nov 09 2018 1:19PM | Last Updated: Nov 09 2018 1:26PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी बीसीसीआयने 12 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना 11 नोव्हेंबर रोजी चेन्नईत होणार आहे. भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.  

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी उमेश, जसप्रीत आणि कुलदीप यांनी तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. 

निवड समितीने तिसऱ्या सामन्यासाठी सिद्धार्थ कौलचा संघात समावेश केला आहे. 

असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम आणि सिद्धार्थ कौल