Sat, Dec 14, 2019 05:55होमपेज › Sports › स्टोक्सचा 'तो' सल्ला पंचानी मान्य केला असता, तर न्यूझीलंडने वर्ल्डकप जिंकला असता!

तर न्यूझीलंडने वर्ल्डकप जिंकला असता!

Published On: Jul 17 2019 3:31PM | Last Updated: Jul 17 2019 3:09PM
लंडन : पुढारी ऑनलाईन

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड अंतिम सामना सर्वांत रोमहर्षक ठरला. विश्वचषकात आतापर्यंतच्या इतिहासात यंदाचा या विश्वचषकातील अंतिम सामना टाय झाला. सामना आणि सुपर ओव्हर दोन्हीही टाय झाल्यामुळे ज्याचे चौकार-षटकार जास्त तो संघ विजयी ठरविण्याच्या नियमाच्या आधारे इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला.

यावर इंग्लड कसोटी टीमचा सदस्य जेम्स अँडरसन म्हणाला, बेन स्ट्रोकने आपल्या संघाला ओवर थ्रो वर मिळालेल्या चार धावा कमी करण्यासाठी सांगितले होते. ज्या की न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने मारलेल्या थ्रो मुळे हा सामना निर्णायक बनला. सहा धावांवर नंतर चांगलेच वादंग माजले.

या ओवर थ्रो मुळे न्यूझीलंडच्या हातातून हे विश्वविजेतेपद थोडक्यात निसटले. नाहीतर आताच्या विश्वविजेत्या इंग्लडचा पराभव झाला असता. यावर अँडरसन म्हणाला, या थ्रो नंतर झटक्यात हात वर करत स्ट्रोकने माफी मागितली. इतकेच नाही तर अंपायरकडे ह्या धावा कमी करण्याची मागणी देखील केली होती असे अँडरसन म्हणाला.

अँडरसन बीबीसी सोबत बोलताना म्हणाला, क्रिकेटचे नियम असे आहेत की, चेंडू विकेटकडे फेकत असताना जर का हा चेंडू आपल्याला लागून मोकळ्या मैदानात गेला तर धाव घेवू नये, मात्र हाच चेंडू चौकार जाणार असेल तर नियमानुसार हा चौकार असल्याचे तो म्हणाला. बेन स्ट्रोक यानंतर अंपायरकडे जावून म्हणाला होता की, आपण ह्या धावा हटवू शकता, आम्हाला ह्या धावा नको आहेत, मात्र नियम असाच असल्याचे तो म्हणाला असे अँडरसनने यावेळी सांगितले.