Fri, Mar 22, 2019 04:15
    ब्रेकिंग    होमपेज › Sports › IPL : केकेआरने दिल्लीला १२९ धावात गुंडाळले

IPL : केकेआरने दिल्लीला १२९ धावात गुंडाळले

Published On: Apr 16 2018 7:51PM | Last Updated: Apr 16 2018 11:30PMकोलकाता : पुढारी ऑनलाईन 

केकेआरच्या २०१ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १२९ धावातच माघारी परतला. सुरुवातीपासूनच चांगल्या धावगतीने फलंदाजी करणाऱ्या दिल्लीचे फलंदाज मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्याने त्याचा डाव १४.२ षटकातच गुंडाळला.  केकेआरकडून सुनिल नारायनेने ३ कुलदीप यादवने ३  बळी टिपले. 

२०१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खाराब झाली. त्यांचे दोन षटकात दोन फलंदाज माघारी परतले. त्यानंतर फॉर्म मध्ये असलेला कर्णधार गंभीरही लगेचच माघारी परतला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद २४ अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या पंत आणि मॅक्सवेलने डाव सावरला. पंतने २६ चेंडूत ४३ धावा केल्या. पंतने जम बसल्यावर फटकेबाजी  करण्यास सुरुवात केली. पंत आता मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच त्याला कुलदिपने बाद केले.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०० धावा केल्या. दिल्लीकडून नितिश राणा आणि आंद्रे रसेलने अखेरच्या पाच षटकात तुफान फटकेबाजी केली. राणाने ३५ चेंडूत ५९ धावा केल्या तर रसेलने १२ चेंडूत ४१ धावा चोपल्या. दिल्लीकडून तेवातियाने ३ तर मॉरिस आणि बोल्ट यांनी २ बळी घेतले.