Sat, Aug 24, 2019 10:15होमपेज › Sports › आयसीसी रँकिंगमध्ये कुलदीपने पटकावले दुसरे स्थान

आयसीसी रँकिंगमध्ये कुलदीपने पटकावले दुसरे स्थान

Published On: Feb 11 2019 4:20PM | Last Updated: Feb 11 2019 4:03PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेत भारताचा २-१ पराभव झाला. मात्र या सामन्यात अनेक खेळाडूंनी आपल्या खेळीचे चांगल्या प्रकारे प्रदर्शन केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने न्यूझीलंड दौऱ्यावर केलेल्या आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

कुलदीपने न्यूझीलंड विरूद्ध अखेरच्या सामन्यात २६ धावा देऊन, दोन बळी टिपले होते. त्यामुळे त्याला आपल्या टी २० कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळाली आहे. पहिल्या स्थानी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आहे. कुलदीप केवळ ६५ गुणांनी मागे आहे.

 

टी-20 इंटरनेशनल: पाच टॉप गोलंदाज

 राशिद खान (अफगानिस्तान)- ७९३

 कुलदीप यादव (भारत)- ७२८

शादाब खान (पाकिस्तान)- ७२०

 इमाद वसीम (पाकिस्तान)- ७०५

आदिल राशिद (इंग्लैंड)- ६७६